देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई:  औरंगजेबावरून सध्या महाराष्ट्रातलं वातावरण तापल आहे. नगर, कोल्हापूरमध्ये त्यावरून मोठा तणाव निर्माण झाला होता. आता त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Birthday) यांनी औरंगजेबाचं छायाचित्र असलेला केक कापला आहे. तेव्हा पुन्हा एकदा नवीन वाद होण्याची शक्यता आहे.. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. तेव्हा मनसे रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी औरंगजेबाचं छायाचित्र असलेला केक आणला होता. राज ठाकरेंच्या हस्ते हा केक कापण्यात आला. याआधी मनसे नेते संदीप देशपांडेंनी औरंगजेबाचा फोटो जाळला होता, त्यावर गुन्हा दाखल झाला होता.


शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवासालाही कापला होता औरंगजेबाचं प्रिंट असलेला केक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचा आज वाढदिवसा दिवशी देखील  मनसे नेते अविनाश जाधव यांनी औरंगजेबाचं प्रिंट असलेला केक कापल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता.वाढदिवसानिमित्त मनसे कार्यकर्त्यांनी शिवतीर्थ येथे शर्मिला ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त अविनाश जाधवांनी औरंगजेबाचं प्रिंट असलेला केक आणला होता. अविनाश जाधव यांचा केक कापताना व्हिडीओ व्हायरल झाला होता. 


कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात औरंगजेबाचा केक आणला. राज ठाकरेंनीही त्यांना नाराज केलं नाही. औरंगजेब वाद असो नाहीतर भोंग्यांचा प्रश्न, हिंदूजननायक ही आपली नवी प्रतिमा बिंबवण्याचा राज ठाकरेंचा हा आणखी एक प्रयत्न मानला जात आहे. 


राज ठाकरेंच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक


मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसैनिकांनी दुग्धाभिषेक केला. मुंबईच्या चेंबूरमधल्या सिंधी कॅम्पमध्ये पंचमुखी हनुमान मंदिराजवळ राज ठाकरेंच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करण्यात आला. तसंच मंदिरातही लघुरुद्राभिषेक करण्यात आला. राज ठाकरे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर्सही मनसैनिकांनी झळकावले. तसंच मंदिरात साकडंही घालण्यात आले. पनवेलच्या मनसे कार्यकर्त्यांनी अनोख्या शुभेच्छा दिल्यात.  पनवेलच्या मॉलमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची फुलांनी रांगोळी साकारण्यात आली. 


घराबाहेर घोषणाबाजी करणा-या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी मध्यरात्री सुनावलं


घराबाहेर घोषणाबाजी करणा-या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी मध्यरात्री सुनावलं. माझा नातू आजारी आहे, जास्ती आरडाओरडा करू नका, नातू झोपलाय असं राज यांनी सुनावलं, त्यानंतर कार्यकर्तेही शांत झाले. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मध्यरात्रीच कार्यकर्ते राज यांच्या निवासस्थानाबाहेर जमा झाले होते.