गद्दारांबाबत दोन दिवसात निर्णय घेणार, राज ठाकरेंचा इशारा
गद्दारांबाबत दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
औरंगाबाद : मनसेचे काही पदाधिकारीच वाईट बातम्या पेरतात. अशा गद्दारांबाबत दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
काही लोक जाणीवपूर्वक बदनाम करतात. अशी नाव माझ्याकडे आली आहेत. ती नाव मी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे ते म्हणाले.
राज ठाकरेंचा दौरा पूर्ण झाला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असल्याचे कार्यकर्ते सांगतात. शिवसेनेची लोकप्रियता घटत असून मनसेची ताकद आम्ही दाखवून देऊ असेही कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.
राज ठाकरे आज औरंगाबादेत आले आता ते आज परतणार आहेत. राज ठाकरे महापालिका निवडणुकीच्या चाचपणीसाठी गुरुवारी रात्री औरंगाबादमध्ये पोहोचले तेव्हा त्यांचं भव्य स्वागत झालं.
खरं तर ते रविवारपर्यंत थांबणार होते पण आता ते शनिवारीच मुंबईला परतणार आहेत. या दौऱ्यादरम्यान रंगला तो औरंगाबादच्या नामांतराचा वाद.
फक्त झेंडा बदलला, भूमिका बदलली नाही असं म्हणत हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्यांनी कधी भूमिका घेतली का? असा प्रश्न राज ठाकरेंनी शिवसेनेला विचारला.
या दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी महापालिका निवडणुकीची चाचपणी करत काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली. नामांतराच्या वादाला फोडणी दिली आणि दीड दिवसाचा दौरा संपला.