अहमदनगर : शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नाकडे मनसेनं दुर्लक्ष केल्याची कबुली मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. अहमदनगरमध्ये बोलत असतांना त्यांनी हे वक्तव्य केलं. मात्र आता ही चूक सुधारत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या ८ वर्षात आम्ही महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आम्ही तयार केली पण त्याच वेळी महाराष्ट्रात भाजपा सेनेच्या युती मुले आमची ब्ल्यू प्रिंट लोकांनी बाजूला केल्याच सांगितलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याची स्पष्ट कबुलीच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अहमदनगरमध्ये दिली. 


बाळा नांदगावकर हे नगरमध्ये मनसे कार्यकर्त्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी आणि गेल्या दीड वर्षापासून बरखास्त झालेली मनसे कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी ते नगरला आले होते . त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ग्रामीण भागाकडे मनसेन दुर्लक्ष केल्याच कबुल केलं. मनसेन आता ही चूक सुधारली असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. नगर शहराच्या नव्या अध्यक्षपदाची जबाबदारी आता गजेंद्र राशिनकर यांना देण्यात आल्याची घोषणा नांदगावकर यांनी केलीय.