जळगाव : जळगावात खिशात ठेवलेल्या मोबाईला स्फोट होऊन एक तरुण जखमी झालाय. काट्या फाईल भागात राहणा-या विकार खान सैफुल्ला खानची उजवी मांडी यात गंभीररित्या भाजलीय. रात्री बंद केलेला मोबाईल त्यानं सकाळी सुरू केला आणि खिशात ठेवला. त्यानंतर थोड्याच वेळात मोबाईलचा स्फोट झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दुर्घटनेमुळं त्यांचे कुटुंबिय भयभित झाले होते. त्यांनी तातडीनं विकार खानला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. एमआय रेड मी कंपनीचं नोट थ्री प्रकारातलं हे मॉडेल असुन याबाबत कंपनीकडे तक्रार केल्याचं जखमी विकार खाननं सांगितलं.