नाशिक : कारागृहात मोबाईल सापडण्याला जेलमधलेच काही कर्मचारी कारणीभूत आहेत. कैद्यांपर्यंत मोबाईल पोहोचवण्यास मदत करणाऱ्या कर्मचाऱ्ंयाची यादी तयार करण्यात आल्याची माहिती कारागृह विभाग महाराष्ट्र राज्य पोलीस उपमहासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांनी दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कर्मचाऱ्यांना यापुढे कैद्यांशी थेट संबंध येणार नाही, अशा ठिकाणी जेलमध्येच हलविण्यात येणार असल्याचं उपाध्याय यांनी सांगितलंय. नाशिक कारागृहासह राज्यातील अनेक कारागृहात मोबाईल जॅमर कमी कॅपिसिटीचे आहे.


 जर कंपनीने सारखेसारखे अपडेट केले तर जॅमर काम करत नाही आणि जास्त कॅपिसिटीचे लावले तर आजूबाजूच्या वस्तीच्या तक्रारी येतात, अशा अडचणीत प्रशासन सध्या सापडलंय, अशी हतबलता त्यांनी व्यक्त केलीय. झी 24 तासने जेलमधील मोबाईल गैरव्यवहार समोर आणत कारागृह प्रशासनाची झोप उडवली होती.