Railway Crime News : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना वाशी आणि घणसोली स्टेशन परिसरात घडल्या आहेत. मोबाईल चोराच्या पाठोपाठ धावत्या ट्रेनमधून उडी मारल्याने एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. हा संपूर्ण थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी  चोरट्याला अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रान्स हार्बर मार्गावर  ट्रेन मधून महिलांच्या हातातील मोबाईल खेचून पळून जाणाऱ्या घटनांमध्ये वाढ झालेय. गेल्या आठवड्यात आशा दोन घटना घडल्या होत्या.  वाशी आणि घणसोली रेल्वे स्थानकातून  महिलांच्या हातातली मोबाईल  खेचून चोरटे पसार झाले. मोबाईल चोराच्या पाठोपाठ धावत्या ट्रेनमधून उडी मारुन एक तरुणी जखमी झाली आहे. 


काजल चंदनशिवे (24) असे जखमी तरुणीचे नाह आहे. काजल वाशीतील जुहूगावात राहते. काजल मुलुंड येथील आयटी कंपनीत कामाला आहे. मागील सोमवारी काजल नेहमीप्रमाणे आपल्या कामावर गेली होती. त्यानंतर रात्री 8 वाजता ती मुलुंड येथून वाशी येथे परत होती. यावेळी घणसोली रेल्वे स्थानकात  एक तरुण  ट्रेन मध्ये चढला आणि त्याने काजलच्या हातातील मोबाईल खेचून धावत्या ट्रेन मधून उडी मारली. या चोरट्याच्या  मागे काजलने देखील धावत्या ट्रेनमधून उडी मारली आणि ती प्लॅटफॉर्म पडली. या घटनेत काजल गंभीर जखमी झाली आहे.


असा सापडला मोबाईल चोर


रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मद्यमातून आरोपीचा  फोटो आणि सीसीटीव्ही सर्व पोलीस ठाण्यात व्हायरल केले. एपीएमसी पोलिसांनी आरोपी  चांद अब्दुल शेखला  शोधून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. चांद याने वाशी आणि घणसोली येथे केलेल्या आणखी दोन गुन्ह्यांची कबूली दिली आहे. 


लोकल ट्रेनच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हाताला काठीने मारून मोबाईल हिसकावले


लोकल ट्रेनच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हाताला काठीने मारून त्यांचा हातातील मोबाईल आणि मौल्यवान वस्तू हिसकवणार्या तसेच लोकल ट्रेन मधे प्रवासा दरम्यान प्रवाषयांचे मोबाईल शिताफीने चोरणाऱ्या दोन जणांना कुर्ला रेल्वे पोलिसानी अटक केली आहे.मंगल सुदाम पाल आणि अफरोज शेख अस या आरोपींची नाव आहेत.चोरलेले मोबाईल विकायचे आणि आलेल्या पैश्यातून कुटन खाण्यात जाऊन पैसे खर्च करत असल्याचे चौकशीत समोर आले.या आरोपींकडून 70 हजर रुपयाचे मोबाईल पोलिसानी जप्त केले.


रेल्वेतील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या खिशातले मोबाईल चोरले


कल्याण रेल्वे पोलिसांनी 2 सराईत मोबाईल चोरांना बेड्या ठोकल्या आहेत. गौतम सिंग आणि समीर खान अशी त्यांची नावं आहेत. रेल्वेतील गर्दीचा फायदा घेत ते प्रवाशांच्या खिशातले मोबाईल चोरायचे. पोलिसांनी दोघांकडून 4 गुन्ह्यांची उकल केली, तसंच 1 लाख रुपये किंमतीचे मोबाईलही जप्त केलेत.