मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion)आज होणार आहे. या मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातील एकमेव महिला खासदार डॉ. भारती पवार यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी प्रितम मुंडे यांना हे पद मिळण्याची शक्यता होती. मात्र ही शक्यता आता हुकल्याचं म्हटलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॅा भारती पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. महाराष्ट्रातून एकमेव महिला केंद्रीय मंत्रीमंडळा जाणार असल्याची चर्चा जोरदार रंगू लागली आहे. डॉ भारती पवार हे नाव अचानक चर्चेत आलं. जाणून घ्या, कोण आहेत डॉ भारती पवार?


डॉ. भारती पवार कोण आहेत? 


डॉ भारती पवार यांचा जन्म 13सप्टेंबर 1978 सालचा. 


2002 मध्ये डॉ. भारती पवार यांनी एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं. 



डॉ भारती पवार या माजी आमदार ए टी पवार यांची दुसऱ्या सूनबाई आहेत. 



डॉ. भारती पवार यांनी देवळा गटातुन नाशिक जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केला. 



गृहकलहामुळे आणि राष्ट्रवादीत दुय्यम वागणूक मिळत असल्याने लोकसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीतून डॉ. भारती पवार यांनी भाजपात प्रवेश केला. 



डॉ. भारती पवार 2019 ला दिंडोरी मतदारसंघात भाजपा कडून खासदार म्हणून नियुक्त झाल्या. 



कोण कोणत्या नावाची चर्चा? 


केंद्रीय मंत्रीमंडळात कोणत्या महिलेची वर्णी लागेल यावर जोरदार चर्चा रंगली होती.  प्रितम मुंडे, रक्षा खडसे या दोन नावांची केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात समावेश होण्याची चर्चा रंगली होती. असं असताना डॉ. भारती पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 


महाराष्ट्रातून या नावाची चर्चा 


महाराष्ट्रातून खासदार नारायण राणे, भिवंडीचे खासदार कपिल पाटील, हिना गावित आणि भागवत कराड यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या शपथविधीनंतर मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे मोदी मंत्रिमंडळाचा हा पहिलाच विस्तार असून राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न यातून केला जात असल्याचं चित्र आहे.