व्हिडिओ : छेड काढणाऱ्या तरुणाला महिलेनं असा शिकवला धडा की...
महिलेने ३० वर्षीय तरुणाचे आपल्या दोन मित्रांच्या मदतीने गुप्तांग कापले
डोंबिवली : तरुण सतत छेड काढतो, त्रास देतो इतकेच नाही तर आपले महिलेवर प्रेम असल्याचे थेट तिच्या पतीलाच सांगतो... या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या एका महिलेने ३० वर्षीय तरुणाचे आपल्या दोन मित्रांच्या मदतीने गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री डोंबिवलीत घडलीय. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेत तुषार पुजारे हा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याला डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या दोन्ही साथीदारांना अटक केली आहे.