कोल्हापूर : जिल्ह्यात पुराच्या पाण्यात पाच दिवसांपासून झाडावर अडकून पडलेल्या माकडांना अन्न पुरवण्यात आले आहे. त्यामुळे या माकडांचा जीव वाचलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पन्हाळा तालुक्यातील आकुर्डे कोर्ले गावातील –कासारी नदी नदीतील झाडावर ३ माकडे गेले ५ दिवस अडकून होती. त्या गावातील मच्छिमारांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी दिनकर चौगुले नावाच्या एका व्यक्तीला माहिती दिली. चौधरी यांनी कोल्हापूर मधील व्हाईट आर्मी नावाच्या एनजीओला याबाबत मदत करण्यास सांगितले.


ही संस्था आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिकेला किंवा स्थानिकांना मदत करत असते. अडकलेल्या माकडांची माहिती मिळताच व्हाईट आर्मीची टीम घटनास्थळी पोहचून त्यांनी माकडांसाठी केळी आणि भुईमुग शेंगा असलेल्या दोन बकेट झाडाला बांधल्या. 


उपाशी माकडांनी ती आनंदाने फस्त केली. तुर्तास पूर ओसरला नसल्याने माकडांना बोटीतून बाहेर आणणे शक्य नसल्याने दोन दिवस पुरेल एवढे अन्न माकडांसाठी ठेवण्यात आले आहे. एनजीओने त्वरीत धाव घेतल्यामुळे माकडांना जीवदान मिळाले आहे.