नागपूर : विदर्भात तीन दिवस आधीच मान्सून दाखल झालाय. शनिवार, रविवारी विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. गोंदिया, भंडारा, गडचिरोलीमध्ये अतिवृष्टीचा अंदाज असून नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्ध्याच्या काही भागातही मोठा पाऊस होऊ शकतो. शनिवारपर्यंत संपूर्ण विदर्भ मान्सूनच्या कवेत जाईल, असा अंदाज आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावती जिल्ह्यातही पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा, चांदुर रेल्वे, वरुड, मोर्शी, चिखलदरा, मेळघाट भागामध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठीची लगबग वाढली आहे. चांदुर रेल्वेत ही मुसळधार पावसामुळे गाडगेबाबा मार्केट परिसरात मोठया प्रमाणात पाणी साचलं. 


भंडारा जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले आहे, जिल्ह्यात पहाटे 3 वाजेच्या दरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली असून या पावसामुळे नागरिकांना उकाळ्या पासून दिलासा मिळाला आहे,  रात्रीच्या सुमारास तब्बाल 30 मिनीटं पावसाने दमदार हजेरी लावली,


गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसानं दमदार हजेरी लावलीये., मागील आठवड्याभरापासून उकाळ्यापासून नागरिक हैराण झाले होते.. त्यामुळे पावसानं नागरिकाना दिलासा मिळालाय. पाऊस वेळेवर आल्यानं शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आलाय


यवतमाळ जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस बरसल्याने शेतीकामांसह जनजीवन विस्कळीत झाले आहे. यंदा मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच जोर धरला त्यामुळे शेतकऱ्यांनी हाती घेतलेली मशागतीसह अन्य शेतीकामे प्रभावित झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी लागवडीयोग्य जमीन तयार करून ठेवली तेथे देखील पाणी साचल्याने व माती वाहून गेलीय. तर शहरातही मान्सूनपुर्व कामं न झाल्यानं कचरा रस्त्यावर येणं, फांद्या कोसळणं असे प्रकार घडलेत.


तासभर झालेल्या मुसळधार पावसाने बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथे हाहाकार उडवला. नागपूर औरंगाबाद हायवे वर या पावसामुळे पाणी साचलं होतं. याचा परिणाम म्हणजे महामार्गावरील वाहतुक काही काळ खोळंबली.हा पाऊस एवढा होता की मोठ्या महामार्गाचे रूपांतर नदीत झालं. डोणगावात जरी धोधो पाऊस झाला तर जिल्ह्यातील काही भागा मात्र पावसाचं चिन्ह नव्हतं.