मुंबई : परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील अनेक भागांना झोडपून काढले. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आदी  भागात जोरदार पावसाने शेतीचे मोठे नुकासना झाले. आता पुन्हा हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. पुढील काही तासांत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी राजावर पुन्हा संकटाचे ढग असल्याची भीती व्यक्त होत आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम महाराष्ट्रातील  पुणे, सातारा कोकणातील रायगड, रत्नागिरीत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.  पुढच्या तीन ते चार तासांत हा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घ्या, असा इशारा हवामान विभागाच्यावतीने देण्या आला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी ट्विट करत पावसाची माहिती दिली आहे.



येत्या ४८ तासात मान्सूनची उत्तरेकडील भागातून माघार घेण्यास अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत येत्या दोन ते तीन दिवसात वादळाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला अधिक दक्ष राहावे लागणार आहे.