मुंबई : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. त्यातच आता हवामान खात्याने येत्या 4 ते 5 दिवसात मान्सून राज्यात सर्वाधिक सक्रिय राहण्याची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. (Heavy Rain Alert In maharashtra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विदर्भ, मराठवाड्यातही काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह रायगड, कोकण आणि अमरावती आणि कोल्हापुरात ही मुसळधार पाऊस होतोय. सोमवारपासून राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. येत्या 4 ते 5 दिवसात आता आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात ही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


पावसाचा अंदाज पाहता एनडीआरएफचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक घेऊन प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा सचिवांना त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याच्या सूचना ही करण्यात आले आहेत.


काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना ही घडल्या आहेत. त्यामुळे अशा ठिकाणाहून लोकांचे स्थलांतर करण्याच्या सूचना ही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.


राज्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही नद्या धोक्याच्या पातळीजवळून वाहत आहेत.