अनिरुद्ध दवाळे / अमरावती : मेळघाट (Melghat in Maharashtra) निसर्ग सौंदर्य सृष्टीने नटलेला प्रदेश. परंतु मेळघाटामध्ये बेरोजगारी, कुपोषण, बालमृत्यू आधी गंभीर समस्या आणि स्थलांतर या गंभीर समस्या बनत चालल्या होत्या. परंतु प्रशासनाने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून (Rojgar Hami Yojana) मेळघाटमधील आदिवासी बांधवांनामध्ये कमालीचे बदल घडवले आहे. त्यामुळे स्थलांतर आणि बेरोजगारीमध्ये काही प्रमाणात आळा बसला आहे अमरावती नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये मेळघाटच्या रोजगार हमी कामाचा डंका वाजला आहे. (Rojgar Hami Yojana work)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेळघाटच्या पहाडी आणि उंच दऱ्याखोऱ्या मध्ये काम करणारे हे मजूर रोजगार हमी योजनेतील आहे. शासनाच्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मेळघाटातील हजारो मजुरांच्या हाताला काम आले आहे. त्यामुळे संसार चालवणे सुखकर झाला आहे. महाराष्ट्रामध्ये मागील काही वर्षांपासून रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली आहे. या रोजगार हमीच्या माध्यमातून मेळघाटामध्ये ही कामे केल्या जात आहे.



यामध्ये आदिवासी महिला व पुरुषांच्या हाताला काम मिळाले असून हक्काची रोजीरोटी त्यांच्यासाठी तयार झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून मेळघाट मध्ये दरवर्षी 37 लाख मनुष्यकामाची निर्मिती केली जाते. दरवर्षी जवळपास 30 हजार मजूर हे काम करत असतात.


मेळघाटमध्ये गेल्या अनेक वर्षापासून रोजगाराची वानवा होती. त्यामुळे वर्षभरातील काही महीने येथील आदिवासी बांधव हे स्थलांतर करून दुसऱ्या ठिकाणी कामाच्या शोधामध्ये जात होते. तिथे गेल्यानंतर त्यांना पुरेसा पैसाही मिळत नव्हता. परंतु सरकारच्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून त्यांना आपल्या गावी मजुरी मिळत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.


सरकारने सुरु केलेल्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला आहे. या योजनेची व्याप्ती सरकारने आणखी वाढवल्यास मेळघाटमधील रोजगाराची वानवा संपुष्टात येण्यासाठी वेळ लागणार नाही.