भाजप खासदाराचा पहिल्यांदाच सरकारविरोधात `एल्गार`
सत्तेत असून सुद्धा शेतकरी कर्ज माफीवर जर सरकार ऐकत नसेल तर, आपण आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊ
माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा : सत्तेत असून सुद्धा शेतकरी कर्ज माफीवर जर सरकार ऐकत नसेल तर, आपण आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊ ,अशी खडतर भूमिका भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे भाजपचे खासदार नाना पटोले यांनी घेतली आहे.
आपण जिथे जाऊ तेथे लाईन उभी करू असा इशारा देखील त्यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे आता त्यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आता सरकार काय निर्णय घेते आता याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
राज्य सरकारने नुकतीच जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी आणि या कर्ज माफीनंतर ऑनलाईन पद्धतीत शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी पाहता आता आपल्याच सरकारचा विरोधात जाऊन खासदार नाना पटोले यांनी टीका करत खासदारकीच्या राजीनाम्याचा इशारा दिला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांची बाजू घेत सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी असे विधान या अगोदर भाजप खासदार नाना पटोले यांनी केले होते. त्यांचा या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. त्यामुळे अजूनही सरकार जर ऐकत नसेल तर आपण आपल्या खासदारकी चा राजीनामा देऊ अशी खडतर भूमिका त्यांनी घेतली आहे.
शिवाय आपण ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी लाईन उभी करू अशी देखील त्यांनी आपली भूमिका मांडली आहे, त्यामुळे सत्तेत असणाऱ्या भाजपाला पुन्हा एकदा घरचाच आहेर मिळाला आहे
तर नाना पटोले यांनी या आधी देखील सरकारला खडे बोल सुनावणीत शेतकऱ्याची सरसकट कर्ज माफी करावी अशी भूमिका मांडली होती तर सूत्र नुसार त्यांचा या विधानावर पक्षश्रेष्ट्रीनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेवर सरकार काय निर्णय घेते आता याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.