अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनवीत राणा (MP Navneet Rana) नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. राजकारणाबरोबरच नवनीत राणा सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात हिरारीने भाग घेत असतात. कधी क्रिकेटच्या मैदानात तर कधी व्हॉलीबॉल स्पर्धेत देखील त्या सहभाग होतात. त्यांचे डान्सचे आणि खेळाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवरात्री उत्सव असो वा मेळघाटमधील होळीचं आदिवासी नृत्य असो, नवनीत राणा यांच्या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळेत. सध्या त्यांच्या अशाच एका भन्नाट डान्सचा व्हिडओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 


अमरावती इथल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी द्वारा वार्षिक सांस्कृतिक संमेलन आणि खेळ उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला खासदार नवनीत राणा उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांच्या आग्रहात्सव नवनीत राणा यांनी स्टेजवर जाऊन 'ढोलीडा' या गाण्यावर भन्नाट डान्स केला. 


नवनीत राणा यांच्या या डान्सची सध्या जिल्हाभरात चर्चा असून त्यांचा हा डान्स व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 


p>


 


नवनीत राणा यांचा डान्स पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. विद्यार्थिनीही त्यांच्याबरोबर उत्साहात सहभागी झाल्या होत्या.