Navneet Rana Meet Ajit Pawar :  खासदार नवनीत राणा अजित पवार गटाकडून  निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. नवनीत राणांची अजित पवारांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांच्या अमरावतीमधल्या निवासस्थानी ही भेट झाली. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नवनीत राणा यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले. 2019 मध्येही नवनीत राणांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने निवडणूक लढवली होती. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. अमित शाहांसोबत मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. संसद अधिवेशनानंतर ही बैठक होणार असल्याचं समजतंय. अमित शाहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी होणार असल्याचं सूत्रांनी म्हटलंय. अमित शहांच्या बैठकीत होणार जागावाटपसदर्भात चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी म्हटल.


जयंत पाटील आणि सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यात चर्चा


राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यात चर्चा झाल्याचं समजतंय.  पुणे विमानतळाच्या व्हीआयपी लाऊंजमध्ये दोघांमध्ये सुमारे अर्धा ते पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र वळसे पाटलांनी त्याचा इन्कार केलाय. बॅग हरवल्यानं विमानतळावर थांबलो होतो, वळसेंशी कसलीही चर्चा झाली नाही, असा दावा जयंत पाटलांनी केला.


राष्ट्रवादीच्या कार्यालयासाठी पदाधिका-यांचा अजब फॉर्म्युला


राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर जिकडे पहावं तिकडे पक्षाच्या कार्यालयावरून वाद सुरू आहेत. धुळ्यातही राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पक्षाच्या कार्यालयावर दावा सांगत आपापलं टाळं ठोकलं. कार्यालयाचा वाद विकोपाला गेल्यानंतर पदाधिका-यांना अचानक सुबुद्धी आली आणि त्यांनी तोडगा काढायचं ठरवलं. आता हे कार्यालय दोन्ही गटांनी संयुक्तपणे वापरण्याचा निर्णय घेतलंय. 


पदाधिका-यांनी दाखवलेली सामंज्यसाची भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र आता खरा प्रश्न आहे की दोन्ही गट एकाच वेळी कार्यालयाचा वापर कसा करतील? एकाच वेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते कार्यालयात आले तर काय होईल? की एखाद्या खासगी कार्यालयाप्रमाणे इथंही शिफ्ट ड्युटीत कामकाज चालेल, याचं उत्तर राष्ट्रवादीचे दोन गटच देऊ शकतील.