Bullock Cart Race | महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा ठेवा असलेल्या बैलगाडा शर्यतींचा थरार पुन्हा रंगणार?
आता लवकरच या बैलगाडा शर्यतीचा (Bullock Cart Race) थरार पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेमंत चापुडे झी 24 तास जुन्नर : बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी (Bullock Cart Race) एक महत्वाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यती बंद आहेत. पण यानंतर आता लवकरच या बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीनं आता केंद्रात (Central Government) हालचाली सुरू झाल्या आहेत. (mp of Shirur Lok Sabha constituency Dr Amol Kolhe demands removal of bull from protected animal list to Union Animal Husbandry Minister Purushottam Rupala)
बैलगाडा शर्यतींचा थरार गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. पण या शर्यतींचा थरार लवकरच पुन्हा अनुभवता येणार आहे. कारण केंद्रीय स्तरावर बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. बैलगाडा शर्यतींसाठी थेट स्थानिक खासदार डॉ. अमोल कोल्हे (Mp Amol Kolhe) यांनी प्रयत्न सुरू केलेत. बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा ठेवा आहे. त्यामुळे बैलाला संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळावं अशी मागणी डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धनमंत्री पुरुषोत्तम रुपाला (Union Cabinet Minister Puroshottam Rupala) यांच्याकडे केलीय. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी बैलांची कशी काळजी घेतात हे त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना एका व्हिडिओद्वारे समजावून सांगितलं.
बैलगाडा शर्यतीसाठी खिलार जातीच्या देशी बैलांचा वापर केला जातो. या बैलांचा वापर शेतीकामासाठी केला जात नाही. मात्र मधल्या काळात सर्वोच्च न्यायालयानं बैलगाडा शर्यतीवर बंदी घातल्यानं ही स्पर्धा बंद झाली. बैलगाडा शर्यत सुरू व्हावी यासाठी अनेक शेतकरी जिवाचा आटापिटा करतायेत. आता खासदार कोल्हे यांच्या मागणीवर केंद्र सरकार नेमका काय निर्णय घेतं यावरच बैलगाडा शर्यतीचं भवितव्य अवलंबून असणारंय.