कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या मुळ प्रश्नाला बगल देण्यासाठी जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण केला जातोय, असा खळबळजनक आरोप खासदार राजू शेट्टी यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केला आहे. तर पी. साईनाथ यांनी शेतकऱ्यांबद्दल मांडलेल मत अतिशय योग्य आणि खर आहे, असल्याचही ते म्हणाले.


पी. साईनाथ यांनी मागणी योग्यच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातलं कृषीसंकट खूप मोठं असून दिवसाला २ हजार शेतकरी संपत आहे. त्यामुळे संसदेचे वीस दिवसांचं अधिवेशन बोलवावं, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केलीय. या मागणीला समर्थन देतानाच राज्य आणि केंद्र सरकारला याचं आजिबात गांभीर्य नाही’, असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. 


‘चर्चा करण्याची सरकारची मानसिकता नाही’


‘शेतकऱ्याचा आवाज ना लोकसभेत पोहोचतो ना विधानसभेत. शेतकऱ्याच्या प्रश्नावर साधी चर्चा करण्याची सरकारची मानसिकता नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिवेशन बोलवल पाहिजे.
पाकिस्तानातुन २००० टण साखर आयात करण्यात आली, अशी अफवा उठविन्यात आली’.


...म्हणून ही अफवा पसरवली


ही अफवा उठवुन कुणीतरी बाजार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. याचा शोध घेण्याची गरज आहे. दुबळ्या साखर कारखाण्यानी भीती पोटी स्वस्तात साखर विकावी म्हणून ही अफवा पसरण्यात आली’, असेही राजू शेट्टी म्हणाले.