Udayanraje Bhosale : महाराजांच्या अपमानाचा राग कसा येत नाही, उदयनराजेंचा संतप्त सवाल
Pune News : तसेच महाराजांच्या अपमानाचा राग कसा येत नाही, महाराजांबाबत बेगडी प्रेम का दाखवता, असा सवालही उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) राजकारण्यांना आणि राजकीय पक्षांना विचारला.
अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagar Singh Koshyari) यांनी शिवाजी महारांजाबाबत (Shivaji Maharaj) केलेल्या विधानाचे राज्यभर पडसाद पहायाला मिळाले. विरोधकांनी राज्यपालांचा निषेध करत जागोजागी आंदोलनं केली. त्यानंतर आता खासदार उदयनराजे भोसले (UdayanRaje Bhosale) यांनी पत्रकार परिषद घेत शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना खडेबोल सुनावले. राज्यपालांनी केलेल्या विधानावरुन त्यांचा समाचार घेतला. तसेच महाराजांच्या अपमानाचा राग कसा येत नाही, महाराजांबाबत बेगडी प्रेम का दाखवता, असा सवालही त्यांनी राजकारण्यांना आणि राजकीय पक्षांना विचारला. (mp udayanraje bhosale press confrence on governor bhagatsingh koshyari controversial statment on shivaji maharaj at pune maharashtra politics)
उदयनराजे काय म्हणाले?
"तुम्हाला काहीच वाटत नसेल तर शिवाजी महाराजांची जंयती साजरी का करायची? महाराजांचे पुतळे कशाला उभारायचे? विमानतळाला महाराजांचं नाव कशाला घ्यायचं. मला हे असं बोलताना वेदना होतायेत. जर तुम्हाला महाराजांचा सन्मान ठेवता येत नसेल, तर त्यांचं नाव घेण्याचंही हक्क तुम्हाला नाही", अशा शब्दात उदयनराजेंनी खंत व्यक्ती केली. तसेच महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना चपराक लगावली.
भगतसिंह कोश्यारींची राज्यपालपदावरून मुक्त होण्याची इच्छा, सूत्रांची माहिती
उदयनराजेंचा 3 डिसेंबरला प्रतिकात्मक आक्रोश
"मी येत्या 3 डिसेंबरला महाराजांची समाधी असलेल्या रायगडावर जाणार आहे. आणप सगळ्यांनी यावं. महाराजांचा अवमान झालाय त्याबद्दल प्रतिकात्मक आक्रोश व्यक्त करणार आहे", असंही उदयनराजेंनी नमूद केलं.
फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करावी
"फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. सत्ताधारी असो किंवा विरोधक सर्वच सारखे आहेत. या प्रश्नांची कुणी गांभिर्याने दखल घेतली नाही, तर जनता आगामी निवडणुकीत दाखवून देईल", असा इशाराही उदयनराजेंनी दिला.