सातारा : Udayanraje Bhosale Birthday : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे मोठी घोषणा करणार आहेत. त्यामुळे ते काय घोषणा करणार याची जास्तच उत्सुकता आहे. राजकीय क्षेत्रात उदयनराजे यांच्या या नव्या भूमिकेमुळे जोरदार चर्चा सुरु आहे. वाढदिवसाचे औचित्य साधत उदयनराजे सामाजिक कार्य की राजकीय निर्णय घेणार, याची कमालीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.(MP Udayan Raje Bhosale will make a big announcement today)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साताऱ्याचे उदयनराजे भोसले हे राज्यसभेचे खासदार आहेत. ते आजच्या वाढदिवसाचे औचित्य साधत एक मोठी घोषणा करणार आहेत, असे त्यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे. साताऱ्यातील गांधी मैदानावर आज 6 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ही घोषणा ते करणार आहेत. या पत्रकात त्यांनी एक अभिनव उपक्रम सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. पण नेमक काय केले जाणार आहे, याची मात्र उत्सुकता सर्वांना लागली आहे


प्रसिद्धी पत्रकात नेमकं काय म्हटलंय?



राजकीय आरोप-प्रतिआरोपांच्या या वातावरणात पहिल्याच वाक्याने ज्या ज्या शक्यता तुमच्या डोक्यात आल्या असतील त्यामधले काहीच नसणार आहे. उपक्रम अभिनव आहे, तेव्हा हे आमंत्रण पण फार औपचारिक अशा धाटणीचे नाही. 


आपण सारेच आपल्या भोवती सुरूअसणाऱ्या घटना पाहत असतो. काही अयोग्य वाटल्या तर त्या कोणीतरी दुरुस्त करेल अशी केवळ इच्छा आपण व्यक्त करत असतो. आम्ही मात्र एका सामाजिक प्रश्नावर गेली अनेक वर्षे प्रशासकीय बदलांसाठी अनेक प्रयत्न केले. पण ते पुरेसे नाहीत. गेल्या काही दिवसांच्या चिंतनातून आम्ही या प्रश्नाचे उत्तर म्हणून स्वतःच एक व्यवस्था उभी करण्याचे ठरविले आहे.


कोणता प्रश्न, काय व्यवस्था अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी आम्ही आपणांस सदर पत्राने आमंत्रण देत आहोत, असे सांगत त्यांनी घोषणेबाबत गूढ कायम ठेवले आहे. त्यामुळे ते आज काय बोलणार आणि काय घोषणा करणार याचीच साताऱ्यात जोरदार चर्चा आहे.