MPSC Job : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बंपर भरती, `येथे` पाठवा अर्ज
MPSC Recruitment 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केली जाणार असून याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.
MPSC Recruitment 2024 : चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधताय? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी येथे लक्ष द्या. कारण एमपीएससी अंतर्गत विविध पदांच्या एकूण 39 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याअंतर्गत असिस्टंट प्रोफेसर, मेडिकल एज्युकेश अॅण्ड रिसर्च ग्रुप एची पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र शासनाअंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तसेच नव्याने स्थापन झालेली महाविद्यालये,धाराशिव, नंदुरबार, परभणी आणि सातारा आणि सिंधुदुर्ग येथे ही भरती केली जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 45 वर्षे असणे आवश्यक आहे.
स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती, दहावी ते MBBS पर्यंत सर्वांसाठी नोकरी
खुल्या गटातील उमेदवारांकडून 719 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल. तर मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग उमेदवारांकडून 449 रुपये शुल्क आकारले जाईल.
पिंपरी-चिंचवड शहरात मोठी पोलीस भरती! इच्छुकांनी 'येथे' पाठवा अर्ज
याची अर्ज प्रक्रिया 1 मार्च 2024 पासून सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपले अर्ज 21 मार्च 2024 पर्यंत पाठवायचे आहेत. एमपीएससीची अधिकृत वेबसाईट https://mpsc.gov.in/ वर याचा अधिक तपशील देण्यात आला आहे.
पदभरतीचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा