Mpsc Exam Question Paper: महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ राज्यभरातील केंद्रांवर पार पडली. या परीक्षेतील वरील दोन प्रश्न आणि त्यासाठी दिलेल्या पर्यायी उत्तरांनी विद्यार्थ्यांना गोंधळात तर टाकलेच शिवाय असे अजब प्रश्न विचारण्याचे प्रयोजन काय? असा प्रश्न परीक्षार्थी विचारत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमचे मित्र तुम्हाला मद्यपान करण्यास प्रभावित करत असतील तर तुम्ही काय कराल, याशिवाय तुम्हाला मूतखड्याच्या वेदनांना सामोरे जावे लागले तर काय कराल, असे अजब प्रश्न एमपीएससीच्या रविवारी पार पडलेल्या परीक्षेत विचारण्यात आले होते. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ राज्यभरातील केंद्रांवर पार पडली. या परीक्षेतील दोन प्रश्न आणि त्यासाठी दिलेल्या पर्यायी उत्तरांनी विद्यार्थ्यांना गोंधळात तर टाकलेच शिवाय असे अजब प्रश्न विचारण्याचे प्रयोजन काय? असा प्रश्न परीक्षार्थी विचारत आहेत. एमपीएससीने दोन्ही पेपरमध्ये विचारलेल्या विविध प्रश्नांपैकी एक प्रश्न दारू पिण्याविषयी विचारण्यात आला आहे. यामध्ये दिलेली उत्तरांचे पर्याय फारच हस्यास्पद होते. 


प्रश्न काय होते. 


1) तुम्हाला मूतखड्याच्या वेदनांना सामोरे जावे लागले तर काय कराल ?
2)  तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत. जर तुम्हाला त्यांच्या सोबत जायचे नसेल आणि त्यांच्या अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयीपासून स्वतःला बाहेर ठेवायचे असेल तर तुम्ही काय कराल?


या उत्तराचे पर्याय


(१) मी माझ्या मित्रांना सांगेन की माझ्या पालकांनी मला दारू पिण्यास मनाई केली आहे.
(२) दारू पिण्यास नकार देईन.
(३) फक्त तुमचे मित्र मद्यपान करतात म्हणून मद्यपान करेन.
(४) नकार देईन आणि त्यांना खोटे बोलेन की तुम्हाला यकृताचा आजार आहे


प्रश्न पण अजब आहेत आणि उत्तरांचे पर्यायही गजब आहे. त्यामुळं विद्यार्थी गोंधळले आहेत. त्यावर एमपीएससीन काही तरी तोडगा काढावा. प्रश्नांची पातळी राखावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तर, एका विद्यार्थ्यांने म्हटलं आहेकी, हे पेपर कोण काढतं, कोण सेट करतं, याची सखोल माहिती घेतली पाहिजे. तसं पाहायला गेलं तर आयोगाचा काहीही दोष नाही. पेपर काढणारी एक एक्सपर्ट कमिटी असती आणि ती कमिटी पेपर सेट करत असते. पेपरमध्ये जे प्रश्न टाकायचे ते टीम ठरवत असते, असं एका विद्यार्थ्याने म्हटलं आहे.