MPSC Recruitment: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत हजारो पदांची भरती सुरु आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदभरतीचा तपशील देण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत  दुय्यम निरीक्षक,  तांत्रिक सहाय्यक,  कर सहाय्यक आणि  लिपिक-टंकलेखक पदे भरली जाणार आहेत. याअंतर्गत एकूण 7 हजार 510 पदे भरली जातील. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य उत्पादन शुल्क गृह विभागात  दुय्यम निरीक्षकची 6 पदे भरली जाणार आहेत. यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 32 हजार ते 1 लाख 1 हजार 600 रुपये पगार दिला जाईल. तांत्रिक सहाय्यकचे 1 पद भरले जाणार असून यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात.  या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 29 हजार 200 ते 92हजार 300 रुपये पगार दिला जाईल. 


कर सहाय्यकच्या 468 जागा भरल्या जाणार असून पदवीधर उमेदवार आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. असलेले उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25 हजार 500 ते 81हजार 100 रुपये पगार दिला जाईल. 


लिपिक-टंकलेखकच्या 7 हजार 35 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. त्यांचा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. वेग असणे आवश्यक आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19 हजार 200 ते 63हजार 200 रुपये पगार दिला जाईल. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 मे 2023 रोजी 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे.  मागासवर्गीय उमेदवारांना यामध्ये 5 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे. 


खुल्या प्रवर्गाकडून उमेदवारांकडून 544 रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांकडून 344 रुपये शुल्क घेण्यात येईल. उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्रात नोकरीचे ठिकाण मिळू शकेल. या रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया 17 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणार असून उमेदवार 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करु शकतात. या पदांसाठी मुख्य परीक्षा 17 डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे.  उमेदवारांना अमरावती, छ.संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये परीक्षा केंद्र दिले जाणार आहे. 


पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा


अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा