Maharshtra ST Bus Pass Offer: महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून एसटीची ओळख आहे. खेड्या-पाड्यातून लाल परीच्या फेऱ्या जातात. त्यामुळं लहान पणी गावी जाताना हमखास या लालपरीतून स्वारी निघायची. आपल्या प्रत्येकाच्या हृदयात लालपरीची आठवण आहेच. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लालपरी हाल सोसते आहे. अनेकदा एसटीच्या तुटलेल्या खिडक्या, दरवाजे, फाटलेल्या सीट असे फोटो समोर येत असतात. मात्र, एसटी महामंडळ परिवहनाकडून यावर उपाययोजना राबवण्यात येत आहे. अधिकाअधिक प्रवासी एसटीला मिळावेत म्हणून योजनाही राबवण्यात येतात. त्यातीलच एक योजना म्हणजे 'आवडेल तिथे प्रवास'. 


काय आहे ही योजना?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी महामंडळाकडून आवडेल तिथे कुठेही प्रवास ही योजना 1988 पासून राबवली जाते. या योजनेंतर्गंत वर्षभरात 12 कोटी 27 लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. या योजनेंतर्गंत प्रवास करायचा झाल्यास 10 दिवसांचा पास देण्यात येत होता. मात्र, 2006 पासून 4 दिवसांचा पासही दिला जात आहे. 2 मे 2010 पासून 10 दिवसांचे पास बंद करुन त्याऐवजी 7 दिवसांचा पास देण्यात येत आहे. 


सध्या जलद, रात्रराणी, आंतरराज्य, शहरी, मिडी बस सेवेअतर्गंत 4 दिवसांच्या पाससाठी पौढांसाठी 1,170 रुपये तर शिवशाही आंतरराज्याकरिता 1,520 रुपये आकारले जातात. सात दिवसांच्या पाससाठी 2,040 व 3,030 रुपये आकारले जातात. 2023 ते 2024 या आर्थिक वर्षात 89,633 पासची विक्री झाली आहे. त्यातून महामंडळाला 1 हजार 226 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. 


काय आहे प्रक्रिया?


- आंतरराज्य वाहतुकीसाठी एसटी सेवा जिथे जाते तिथपर्यंत हे पास वैध राहणार आहेत. 


- योजनेतील सर्व प्रकारचे पास महामंडळाच्या शहरी वाहतुकीत वैध राहतील


- उच्च दर्जाच्या गाडीचा पास निम्न दर्जाच्या गाडीस वैध राहतील


- पासची मुदत संपल्यानंतर परताना केला जाणार नाही. 


- आवडेल तेथे कोठेही प्रवास पास योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या पासाच्या दिवसाची गणना ००.०० ते २४.०० अशी करण्यात येईल. पासाचे मुदतीच्या शेवटच्या दिवशी प्रवासी सदर पासावर २४.०० वा.नंतर प्रवास करत असेल तर पुढील प्रवासासाठी तिकीट घेणे आवश्यक राहील.


- साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी (साधी, जलद, रातराणी, शहरी, यशवंती (मिडी) आंतरराज्य मार्गासह ग्राह्य राहतील.


 


वाहतूक सेवेचा प्रकार ७ दिवसाच्या पासाचे मुल्य ४ दिवसाच्या पासाचे मुल्य

  प्रौढ मुले प्रौढ मुले
साधी(साधी,जलद,रात्रसेवा,शहरी,व यशवंती(मिडी) आंतरराज्यसह २०४० १०२५ ११७० ५८५
शिवशाही (आसनी) आंतरराज्यसह ३०३० १५२० १५२० ७६५