अलिबाग :  अलिबागकरांसाठी (Alibaug) गूड न्यूज आहे. एसटी महामंडळाने (MSRTC) अलिबाग-पनवेल एसटी (Alibaug-Panvel St Timetable) फेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक जण गावी गेलेले आहेत. मात्र मुंबईला परतताना अनेकांना उभ्याने प्रवास करावा लागतो. प्रवाशांची गैरसोय होते. (msrtc state transport incresed alibaug panvel st bus frequency)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. तसेच महामंडळाने अलिबाग ते पनवेल पर्यंत विनाथांबा तसंच थांबा घेणाऱ्या स्वतंत्र गाड्या सोडल्या आहेत.


अलिबाग हा पर्यटन तालुका आहे. मुंबईपासून नजिक असल्याने पर्यटकांची अलिबागला पहिली पसंती असते. त्यामुळे अनेक पर्यटक हे अलिबागला येतात. या पर्यटकांना मुंबईला परतताना नाईलाजाने गर्दीत प्रवास करावा लागतो. 


तसेच रेवस-मुंबई आणि मांडवा-मुंबई या जलमार्गाने अनेक जण प्रवास करतात. मात्र मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मांडवा-मुंबई जलवाहतूक सेवा 26 मे पासून 3 महिन्यांसाठी बंद असणार आहे. त्यामुळे जलवाहतूकीचा पर्यायही उपलब्ध नसेल. त्यामुळे एसटी महामंडळाच्या निर्णयामुळे नेहमीच जलमार्गाने प्रवास करणाऱ्यांचाही खोलंबा होणार नाही.  तसेच एसटीच्या तिजोरीतही भर पडेल.


परशुराम घाटातली वाहतूक उद्यापासून


दरम्यान मुंबई-गोवा हायवेवर परशुराम घाटातली वाहतूक उद्यापासून नियमित सुरु होणार आहे. परशुराम घाटातली वाहतूक ही जवळपास महिनाभर होती. रुंदीकरणाच्या कामासाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मात्र त्यानंतरही रुंदीकरणाचं काम 65 टक्केच पूर्ण झाल्याची माहिती मिळतेय.