सह्याद्रीच्या पोटातून धावणार देशातील पहिली बुलेट ट्रेन; मुंबई-अहमदाबाद प्रवास आत्ता सुस्साट होणार
Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशात पहिल्या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर गेल्या पाच वर्षांपासून काम सुरू आहे. प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे.
Bullet Train First Mountain Tunnel: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने ( National High Speed Rail Corporation Limited) बुलेट ट्रेन प्रकल्पातील महत्त्तवाचा टप्पा पूर्ण केला आहे. गुजरातमधील वलसाड येथील बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये पहिला माउंटन बोगदा तयार करण्यात आला आहे. यासंदर्भांत नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने माहिती दिली आहे.
NHSRCLने दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या 10 महिन्यांतच हा बोगदा तयार करण्यात आला आहे. बुलेट ट्रेन याच बोगद्यातून जाणार असून मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांना जोडणार आहे. बुलेट ट्रेनने मुंबई ते अहमदाबाद प्रवासांचा वेळ 127 मिनिटांत पूर्ण होणार आहे. माउंटन बोगदा गुजरातयेथील वलसाड जिल्ह्यातील उंबरगाव तालुक्यातील जरोली गावापासून जवळपास 1 किलोमीटर दूर आहे. हा बोगदा तयार करण्याचे काम न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड (NATM)ने केले आहे. या बोगद्याने बांधकाम करणे खूपच खडतर होते. बोगदा बनवण्यासाठी खूप विचारपूर्व व सर्व तांत्रिक प्रक्रिया वापरुन स्फोट करण्यात आले. हा बोगदा सह्याद्री पर्वतरांगादरम्यान तयार केला आहे.
बुलेट ट्रेनच्या हा पहिल्या माउंटन बोगद्याची एकूण लांबी 350 मीटर इतकी आहे. तर 12.6 मीटर रुंदी आणि 10.25 मीटर उंच आहे. या बोगद्याचा आकार सिंगल ट्यूब हॉर्सप्रमाणे आहे. या बोगद्यात बुलेट ट्रेनचे दोन रूळ असतील. मुंबई आणि अहमदाबाद शहरांना जोडण्याचे काम हा बोगदा करतो. NHSRCL नुसार, बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गंत बांधण्यात येणाऱ्या मार्गात डोंगराळ भागात सात बोगदे असणार आहेत. तर, एक बोगदा समुद्राखाली असेल. बुलेट ट्रेनचा समुद्राखालील हा भारतातील पहिलाच बोगदा असणार आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर प्रकल्पाची अंदाजे किंमत 1.08 लाख कोटी इतकी आहे.
समुद्राच्या पोटातून जाणार बुलेट ट्रेन
राज्यात बुलेट ट्रेनचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. मुंबईतील बीकेसीसह समुद्राखालील ७ किमी लांबीच्या बोगद्यासह २१ किमी लांबीच्या बोगद्याचे कामदेखील सुरू करण्यात येणार आहे. मुंबईतील बीकेसी ते ठाणेदरम्यान 21 किलोमीटरचा भूमिगत मार्ग बांधला जाणार आहे. हा मार्ग समुद्राच्या खालून तयार केला जाणार आहे. 7 किलोमीटरचा मार्ग हा ‘अंडरसी टनल’चा म्हणजेच समुद्राखालून जाणाऱ्या बोगद्याचा असेल.