मुंबई : सकल मराठा समाजातर्फे 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलीय. मात्र या आंदोलनात नवी मुंबईतील मराठा समाज उतरणार नसल्याचं मराठा समाज समन्वयकांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली. २५ जुलै रोजी झालेल्या मराठा आंदोलनाला नवी मुंबईत हिंसक वळण लागलं होतं. त्यात दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे नवी मुंबई परिसरात शांतता टिकून राहावी यासाठी मराठा समाज सहभागी होणार नाही आहे.


मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यभरात 9 तारखेला आंदोलन होणार असलं तरी मुंबईमध्ये मोर्चा निघणार नाही आहे. मुंबईत आंदोलनाला झागलेल्या हिंसक वळणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.