पाण्यातून गुंगीचं औषध दिलं अन्...; वांद्र्यात 18 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार
![पाण्यातून गुंगीचं औषध दिलं अन्...; वांद्र्यात 18 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार पाण्यातून गुंगीचं औषध दिलं अन्...; वांद्र्यात 18 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2024/10/09/801306-girlrapedffg.jpg?itok=tD9Xf1F7)
Mumbai Crime News: वांद्रे परिसरात १८ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
Mumbai Crime News: मुंबईतील सीएसएमटी स्थानकाबाहेर एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच आता वांद्रे येथीही 18 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर, एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. कारने काकाच्या घरी सोडण्याचे आश्वासन देऊन तिला कारमध्ये बसवलं. नंतर पाणी प्यायला देण्याच्या बहाण्याने तिला पाण्याच्या बाटलीत गुंगीच औषध टाकून तिला देण्यात आलं. त्यानंतर दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे तरुणी शुद्धीवर आल्यावर तिला तिच्यासोबत काय घडलं हे लक्षात आलं.
नराधमांनी तरुणी बेशुद्ध झाल्यावर तिला अज्ञातस्थळी नेण्यात आलं. तिथे तिच्यावर आळीपाळीने अत्याचार करण्यात आलं. तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिच्या लक्षात आलं. यावेळी आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला घरी सोडण्यात आलं. घरी सोडल्यानंतर तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय चाचणी केली. यात तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक केली आहे. तर, एकाचा शोध सुरू आहे. त्यासाठी एक पथक तयार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सीएसएमटी स्थानकाबाहेर एका 29 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेरील टॅक्सी स्टॅडच्या पाठीमागे आपल्यावर बलात्कार झाला असा आरोप महिलेने केला होता. 22 सप्टेंबरला ही घटना घडली होती. सीएसएमटी स्थानकाबाहेर महिला एकटी असताना तिला दोन अज्ञात व्यक्तींनी गाठलं आणि तिचे तोंड दाबून टॅक्सी स्टँडच्या मागे नेऊन तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप महिलेने केला आहे.