मुंबई : मुंबई - गोवा महामार्गावर महाड येथे  केंबुर्ली गावलगत कोसळलेली दरड बाजुला करण्यात प्रशासनाला यश आल आहे. त्याआधी येथून एकेरी वाहतूक सुरु करण्यात यश आले होते. तसेच खोळंबलेली कोकण रेल्वेची वाहतूक सुरु झाली आहे. दरम्यान, काही गाड्या उशिराने धावत आहे. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळत आहे. नागरिकांना सावधनतेचा इशारा देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मुंबई -गोवा महामार्गावरची महाडजवळच्या केंबुर्ली गावात चार तासानंतर एकेरी वाहतूक सुरू झालीय. पण दोन्ही बाजूनं लागलेल्या वाहनांच्या रांगा बघता सगळं सुरुळीत होण्यास बराच वेळ लागला. पहाटे साडेपाचच्या सुमारास महाड जवळच्या केंबुर्ली गावलगत  महामार्गावर दरड कोसळल्यामुळं मातीचा ढिगारा रस्त्यावर आला. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. मुंबई-गोवा महार्मागाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू असल्यानं या भागात आधीच वाहतूक धिम्या गतीनं होते. त्यातच मुसळधार पावसानं मातीचा ढिग रस्त्यावर आला.



दरम्यचान मुंबई - रायगड  महामार्गावर  पेणजवळ ट्रक बंद पडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झालीय. त्यामुळं या  महामार्गावर दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या  रांगा लागल्या होत्या. तर, तिकडे रोह्यात कोकण रेल्वे मार्गावर मालगाडी बंद पडल्यानं रेल्वे रेल्वे मार्गही ठप्प होती. कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत झालेय.