नवी मुंबई : मुंबई उच्च न्यायालयानं बेलापूर येथील बावखळेश्वर मंदिर व ट्रस्टचं ऑफिस महिन्याभरात जमीनदोस्त करण्याचे निर्देश दिलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रान्स ठाणे क्रीक इंडस्ट्रियल एरियामधील (टीटीसी) अनेक बेकायदा बांधकामे तोडण्यात आली असली तरी एमआयडीसीच्या सुमारे अकराशे चौ. मी. भूखंडावरील बावखळेश्वर मंदिर व मंदिर ट्रस्टच्या ऑफिसवरील कारवाई गेल्या अनेक वर्षांपासून रखडली होती.


मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश


अखेर मुंबई उच्च न्यायालयाने याविषयी नुकताच आदेश देऊन हे मंदिर व ट्रस्ट ऑफिससह इतर सर्व बांधकामे जमीनदोस्त करण्याचे निर्देश दिलेत. राज्य सरकार व एमआयडीसीने गरज पडल्यास पोलीसबळाची मदत घेऊन चार आठवड्यांच्या आत पाडण्यास सांगितले आहे. त्यामुळे या मंदिराशी संबंधित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक पुन्हा एकदा दणका बसला आहे. 


अधिका-यांवर कारवाई


तसेच येथील सर्व बेकायदा बांधकामे ही एमआयडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताविना शक्य नाही, असं मत व्यक्त करत एमआयडीसीने जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवरही कायद्यानुसार कारवाई करावी, असे निर्देशही खंडपीठाने निकालात दिले आहेत.