#RainUpdates : जाणून घ्या काय आहे रेल्वे वाहतुकीची सद्यस्थिती
एकंदर परिस्थिती पाहता....
मुंबई : शुक्रवारपासून पडणारा पाऊस आणि त्यानंतर उदभवलेली एकंदर परिस्थिती पाहता शनिवार आणि रविवारी मुंबईच्या लोकल सेवेवर याचे थेट पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. रविवारी सायंकाळपासून मुंबईसह ठाणे आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर ओसरला परिणामी सोमवारी नोकरदार वर्ग आणि प्रवाशांच्या सोयीसाठी एकंदर परिस्थिती पाहता सीएसएमटी ते कल्याण, सीएसएमटी-पनवेल, सीएसएमटी-गोरेगाव, ठाणे-पनवेल रेल्वे चालवल्या जाणार आहेत.
दरम्यान, सध्याच्या घडीला मध्य रेल्वेची धीम्या गतीचटी वाहतूक बऱ्याच अंशी पूर्ववत आल्याचं म्हटलं जात आहे. पण, जलद गतीच्या रेल्वे वाहतुकीवर अद्यापही काही अडथळे आहेत. कल्याण ते बदलापूर आणि कल्याण ते कसारा या मार्गावरील रेल्वे वाहतूकही पावसाच्या परिस्थितीनुसार सुरू करण्यात येणार आहे. बदलापूर-कर्जत मार्ग मात्र आजही बंद ठेवण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवरील वाहतूक कल्याणपर्यंत सुरू असल्याचं कळत आहे. या मार्गावरी वाहतूक ही पावसावर अवलंबून असून, आज परिस्थितीनुसार लोकल गाड्या चालवण्यात येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. तर, हार्बर आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक धिम्या गतीनं सुरू आहे.
बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर परिसरात पावसाचा जोर ओसरला, मात्र अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे वाहतूक मार्गांत काही अडथळे येत आहेत.
अतिवृष्टी आणि पुरसदृश्य परिस्थितीचा फटका तासांसाठी कोकण रेल्वे रद्द करण्यात आली आहे. अतिवृष्टी आणि रोहा इथं दरड कोसळल्यामुळे मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला होता कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्यात. तर अनेक गाड्या विविध स्थानकात थांबून ठेवण्यात आल्या होत्या. त्याही रद्द करण्यात आल्यात. शेकडो प्रवासी विविध स्थानकात अडकून पडले असून, वाहतूक सेवा पूर्ववत होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.