वसईः सिग्नल दुरुस्तीचे काम करताना लोकलची धडक, तीन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू
Vasai Local News Update: वसईत लोकलच्या धडकेत रेल्वेच्या तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येतेय. सिग्नल दुरुस्तीचे काम करत असताना घडला अपघातात नायगाव- वसई रेल्वे स्थानकादरम्यानची घटना
Vasai Local News Update: वसईत एक धक्कादायक घटना घडली आहे. लोकलच्या धडकेत तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सिग्नल दुरुस्तीचे काम करत असताना हा अपघात घडला आहे. नायगाव-वसई रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
वसई रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनच्या अपघातात सिग्नल विभागाच्या तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. वसई रोड व नायगाव रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर सिग्नल दुसरतीचे काम करत असताना लोकलने या तीन कर्मचाऱ्यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की तीन कर्मचाऱ्यांचा धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास चर्चगेट - विरार लोकलने हा अपघातात घडला आहे.
रेल्वे अपघातात कर्मचाऱ्यांचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने वसई विभागातील सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. तसंच, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचारी हे भाईंदर विभागाचे असून अभियंता बासू मित्रा, सोमनाथ उत्तम आणि सचिन वानखेडे अशी मृत कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
लोकलच्या धडकेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना 55 हजारांची मदत देण्याचं जाहीर करण्यात आली आहे. रेल्वेने ही मदत जाहीर केली आहे. तसंच, रेल्वेने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच, 15 दिवसांच्या आत मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान आणि इतर देयके वितरीत केली जाणार आहेत. तडजोडीच्या थकबाकीची प्रक्रिया सुरू केली असून या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
गडचिरोलीत 5 महिला बुडाल्या
गडचिरोली जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मिरची तोडणीसाठी मजुरांना घेऊन जाणारी नाव उलटल्याने सात महिला बुडाल्या आहेत. मंगळवारी 11 वाजताच्या सुमारास ही घटना चामोर्शी तालुक्यातील गणपूरलगत वाहणाऱ्या वैनगंगा नदीत घडली आहे. एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून पाच महिलांचा अद्यापही शोध लागलेला नाही.