Mumbai Local Train Update: मुंबईच्या लगतच्या शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहेत. मुंबईतील घरांच्या वाढत्या किंमती यामुळं मुंबईशेजारी असलेल्या शहरांमध्ये अनेक जण घर घेतात. या शहरांतून मुंबईत पोहोचण्याचा पर्याय म्हणजे मुंबईची लोकल. मात्र, लोकलमध्येही प्रवाशांची संख्या दुपट्टीने वाढत आहे. तर, शहरांतही लोकसंख्या वाढताना दिसत आहे. त्यालाच पर्याय म्हणून रेल्वे प्रशासन अनेक ठिकाणी नवनवीन प्रकल्प राबवत आहेत. पश्चिम रेल्वेवर असलेल्या विरार-डहाणू मार्गावरील प्रवाशांनाही लवकरच दिलासा मिळणार आहे. या मार्गावल लोकल फेऱ्यांचा विस्तार करण्याचा प्रकल्प रेल्वेने हाती घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरार-डहाणू रेल्वे मार्गावरील मर्यादित लोकल धावत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळंच रेल्वेने आणखी दोन ट्रॅक टाकण्याचे प्रकल्प हाती घेतला आहे. पश्चिम रेल्वेवरील लाखो प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी विरार-डहाणू मार्ग चौपदरीकरण प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या परवानगी अभावी हे काम रखडले होते. मात्र आता न्यायालयाच्या आदेशाना पश्चिम रेल्वेचा मार्ग मोकळा झाला आहे. 


विरार-डहाणू रेल्वे मार्गात आणखी दोन ट्रॅक उभारण्यासाठी वैतरणा नदीवर आणखी एक पुल बांधणे आवश्यक होतो. मात्र, पुल उभारणीसाठी खारफुटी तोडणे आवश्यक आहे. त्यातरता राज्य सरकारच्या वन खात्याने रेल्वेला सशर्त परवानगी दिली आहे. मात्र त्याबदल्यात रेल्वे 54 हजार झाडे लावणार आहे. 


रेल्वेतर्फे ज्येष्ठ वकील बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला सांगितले की, खारफुटीचे रोपण करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळं जास्त खारफुटीचे रोपण करता येणार नाही. त्याबदल्यात रेल्वे वन खात्याच्या मालकीच्या जमिनीवर 54 हजार झाडे लावणार आहे. संबंधित सर्व प्राधिकरणांनी आवश्यक त्या परवानग्या दिल्या आहेत. न्यायालयाने त्यांचा युक्तीवाद मान्य करत मंजुरी देणाऱ्या सर्व प्राधिकरणांना रेल्वे प्रशासन आश्वासन दिल्याप्रमाणे खारफुटी व झाडांचे रोपण करतेय का यावर लक्ष ठेवतील, असं स्पष्ट केलं आहे. 


विरार- डहाणून चौपदरीकरण प्रकल्पासाठी सुमारे 64 किमी लांबीचे रूळ जोडण्यात येणार आहे. प्रकल्पातील महत्त्वाचा भाग म्हणजे वैतरणा पूल उभारणं. वैतरणा नदीवर 424 मीटर आणि 477 मीटर असे 2 पूल उभारण्यात येणार आहेत. तसंच 16 मोठे पूल आणि 67 लहान पूल अशा एकूण 85 पूल उभारण्यात येणार असल्याचं समजतंय.