नाशिक :  जिल्ह्याची  जीवनवाहीनी समजल्या जाणाऱ्या  मनमाड -छत्रपती शिवाजी टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेस आजपासून अत्याधुनिक  रुपात  प्रवाशी  चाकरमान्यांच्या  सेवेत  रुजू  झाली आहे. एअर टँक, एअर डिस्क ब्रेक तंत्रज्ञान वापरून या पंचवटीचे नविन कोच डिजाईन आले आहे. मुंबईला  अप-डाउन करणाऱ्या  चाकरमानी व प्रवाश्यांसाठी  पंचवटी एक्सप्रेसमध्ये एक घरच आहे .  २५ वर्षानंतर प्रथमच  पंचवटी एक्स्प्रेसचा  रॅक  बदलण्यात  आला  असून  एकूण  २० असलेले  हा आकर्षक रॅक लखनऊ  येथे  तयार  करण्यात आलाय.  २० कोचपैकी १० कोच कुर्सीयान तर उर्वरित १० वातानुकुलित आहेत. 


आधुनिक पद्धतीने  डब्ब्यांची रचना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुर्सीयानमध्ये १०२ प्रवासी क्षमता, तर वातानुकुलित मध्ये ७८ प्रवासी क्षमता आहे.या कोचसाठी प्रथमच अत्याधुनिक अश्या एअर डिस्क ब्रेकचा वापर केलेला आहे. प्रवाश्याच्या सुरक्षिततेसाठी एअर ब्रेक उपयुक्त ठरणार आहे.  त्याचप्रमाणे नविन रॅकमध्ये  आरामदायी  बैठक  व्यवस्था असून आधुनिक पद्धतीने  डब्ब्यांची रचना  करण्यात आली आहे लाईट व  प्रवाश्यांच्या सुरक्षिततेत पुरेपुर काळजी  घेण्यात आली असून  प्रत्येक डब्यात अग्निशामन  व्यवस्था करण्यात आली आहे. तर अत्याधुनिक स्वच्छतागृह  आहे.विशेष म्हणजे  प्रत्येक डब्ब्यात मोबाईल चार्जिंग  सुविधा देण्यात आली .नव्या  रूपासह  प्रवाश्यांचा  प्रवास नक्कीच  सुखकर  होईल.


आनंदाच्या भरात बिपीन गांधी यांचा मृत्यू


दरम्यान, नाशिक-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी अख्खं आयुष्य खर्ची घालणाऱ्या आयुष्यभर पंचवटी एक्स्प्रेसाठी खस्ता खाणाऱ्या बिपीन गांधी यांना आज नवीन पंचवटी एक्स्प्रेच्या येण्याच्या आनंदानं नाशिकच्या प्लटफॉर्मवर हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच ययांचा मृत्यू झाला. रेल प्रवासी संघटनेचा आजचा आनंद दिवस होता. मात्र, गांधी यांच्या मृत्यूने आनंदी वातावरण गंभीर झालं. ज्यांनी आयुष्यभर या गाडीसाठी प्रयत्न केले आणि त्याच गाडीत त्यांचे प्राण गेल्याने अनेकांना चुटपूट लागली. तशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त होताना दिसत होती. त्यांच्या मृत्यूने गाडीत सुन्न वातावरण दिसून आले.