वसईः बहिणीच्या बर्थ-डेला जाताना काळाचा घाला; खड्ड्यांमुळे गमावला तरुणीने जीव
Mumbai News Today: खड्ड्यांमुळं एका 27 वर्षीय तरुणीने जीव गमावल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Mumbai News: मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांमुळं एका 27 वर्षीय विवाहित महिलेला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळं संताप व्यक्त होत आहे. बहिणीचा वाढदिवस साजरा करायला जात असतानाच काळाने घाला घातला आहे. यामुळं परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक महामार्गांवर खड्ड्यांचे साम्राज पसरले आहे. त्यामुळं वाहतूक कोंडीसह अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरही खड्डे पडले आहेत. याच महामार्गावर आज एक अपघात भीषण अपघात घडला आहे. यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पूजा गुप्ता असं या विवाहित महिलेचे नाव आहे.
पूजाही ती मालाड पश्चिम परिसरात राहणारी आहे. वसईत राहणाऱ्या मामेबहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात होती. आपल्या दिरासह ती दुचाकीवरून वसईच्या वालीव येथे जातं होती. रात्री ९ च्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बापाणे पूलावरून दुचाकी खाली उतरत असताना मध्येच असलेल्या खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळली.
दुचाकी खड्ड्यात आदळल्यानंतर यावेळी मागे बसलेली पूजा खाली पडली आणि त्यामुळं तिच्या डोक्याला दुखापत झाली होती. पूजा बेशुद्ध पडल्यानंतर तिला लगेचच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादम्यान पूजाचा मृत्यू झाला. नायगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकास्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पूजाच्या मृत्यूनंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. खड्ड्यांमुळं अनेक अपघात होत असेन यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने होत आहे. नागरिकांनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे. खड्ड्यांमुळं एका तरुणीला जीव गमवावा लागल्यानंतर तरी प्रशासनाला जाग येईल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वसईच्या तरुणीचा अमेरिकेत मृत्यू
नालासोपाऱ्यातील भांडारआळी येथे राहणाऱ्या तरुणीचा अमेरिकेत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रुही भूषण राऊत असं या तरुणीचे नाव असून ती गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकेत रॉयल कॅरेबीयन शिपवर कामावर होती. सोमवारी अचानक तिच्या छातीत दुखू लागले. यानंतर तिला हृदयविकाराच्या झटका आला आणि त्यात तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.