Mumbai Crime News: दादर स्थानकात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी नंदिग्राम एक्स्प्रेस दादर स्थानकात आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. एक्स्प्रेसच्या शौचालयात एका प्रवाशाचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. शौचालयात प्रवाशांने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नंदिग्राम एक्सप्रेस ही  रेल्वे दादर स्थानकात आल्यावर   शौचालयात 50 वर्षांचा व्यक्ती गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली. शौचालयात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच गोंधळ माजला होता. त्यानंतर लगेचच रेल्वे पोलिसांना याची सूचना देण्यात आली. रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी मृतदेह खाली उतरवला त्यानंतर रुग्णालयात नेण्यात आला. 


मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती मुळचा परभणी जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. तसंच, सध्या हा व्यक्ती घाटकोपर असल्फा  परिसरात वास्तव्यास होता. काही दिवसांपूर्वी त्याच्यावर घाटकोपर पोलीस ठाण्यात छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तो त्या प्रकरणात फरार होता, अशी माहिती समोर येत आहे. 


त्याच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामुळं तो मानसिक तणावात असू शकतो. त्यामुळं त्यानं आपलं जीवन संपवलं असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीने नांदिग्राम एक्सप्रेसच्या शौचालयात स्वतःला गळफास लावण्यासाठी त्याच्याकडे असलेल्या मफलरचा वापर केल्याचं समोर आलं आहे. दादर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे


सुटकेसमध्ये सापडला होता मृतदेह


रविवारी रात्री दादर रेल्वे स्थानकावर बॅगेमध्ये मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने केलेल्या तपासणीत बॅगेमध्ये हा मृतदेह सापडला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी चार तासांत छडा लावला होता. त्याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून  मृतक तसेच आरोपी हे मूक बधिर आहेत.  दादर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ११ येथे एक अनोळखी व्यक्ती सोमवारी सकाळी एक मोठी ट्रॉली बॅग घेऊन जात होता. गस्तीवर असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोषकुमार यादव यांना त्याच्याव संशय आल्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीला थांबवून त्याची बॅग तपासली असता. त्यात रक्ताने माखलेला मृतदेह होता. तपासात तो मृतदेह अर्शद अली सादीक अली शेख(३०) याचा असून तो सांताक्रुझ कलिना परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली.