मित्राच्या मृत्यूचा लाईव्ह थरार त्याने डोळ्यासमोर पाहिला, थरकाप उडवणारा VIDEO
दोन मित्र इमारतीखाली बोलत असताना काळाने गाठलं, थरकाप उडवणारा VIDEO
दहिसर : काळ कधी सांगून येत नाही. अगदी धडधाकट चालत्या बोलत्या माणसालाही मृत्यूने गाठल्याच्या अनेक घटना आपण ऐकत असतो. अशाची काहीशी घटना दहिसरमध्ये घडली आहे. मित्राबरोबर गप्पा मारणाऱ्या एका तरुणाला काळाने गाठलं, आपल्या मित्राच्या मृत्यूचा लाईव्ह थरार डोळ्यासमोर पाहावा लागला.
दहीसर पूर्वेच्या ओवारीपाडा भागात महालक्ष्मी सोसायटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. दोन मित्र एका इमारतीखाली गप्पा मारत उभे होते. त्याचवेळी अचानक स्लॅब एका तरुणाच्या डोक्यावर पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. कल्याण गिरी असं या तरुणाचं नाव असून तो 40 वर्षांचा होता.
अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दहीसर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
व्हिडिओत नेमकं काय?
एक तरुण आपल्या मित्राबरोबर घराबाहेर गप्पा मारत होता. त्याचवेळी इमारतीवरुन एक मोठा स्लॅब त्या तरुणाच्या डोक्यावर कोसळतो. हा फटका इतका जबरस्त होता की तो तरुण जागीच कोसळतो. समोर उभ्या असलेल्या त्याच्या मित्रालाही मार बसल्याचं व्हिडिओत दिसतंय.
या घटनेनंतर जखमी झालेल्या तरुणाचा आरडाओरडा ऐकून काही लोक तिथे धावत येतात,