अभिनेता एजाज खानला अंमली पदार्थप्रकरणी अटक
बिग बॉसमधील प्रसिद्ध अभिनेता एजाज खानला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक
नवी मुंबई : पोलिसांच्या अंमली विरोधी पथकानं बिग बॉसमधील प्रसिद्ध अभिनेता एजाज खानला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली. मंगळवारी बेलापूरमधील ' के स्टार' हॉटेलमध्ये तो आला होता. त्यावेळी पोलिसांनी धाड टाकून त्याला अटक केली.
त्याच्याकडे बंदी असलेल्या नशा येणाऱ्या ड्रगच्या आठ गोळ्या सापडल्या. पोलिसांनी त्याला वाशी कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी त्यानं माध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एजाजनं हा माझ्याविरोधात कट असून सर्व काही समोर येईल, अशी प्रतिक्रिया दिली.