Mumbai Police Horse Mounting Unit: मुंबई पोलिस दलात लवकरच माउंटेड पोलिस यूनिट (अश्व दल) स्थापन करण्यात येणार आहे. राज्य सरकारने यासाठी 36 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मुंबई पोलिस लवकरच 30 घोडे खरेदी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसंच, मुंबईत गस्तीसाठी पोलीस हेच घोडे वापरणार असल्याची माहिती समोर येतं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारने पोलिसांना 36 कोटी रुपयांची निधी विस्तारीत केली आहे. त्यातून पोलिसांसाठी तीस तरणेबांड, सदृढ घोडे खरेदी केले जाणार आहेत. तसंच, सर्व सुविधा असलेला तबेलादेखील बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर पोलिसांना घोडेस्वारीचे प्रशिक्षण व घोड्यांचा आहार व निगा राखण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळं आता लवकरच मुंबई पोलिस घोड्यावरुन गस्त घालताना दिसणार आहेत. 


भारतातील मेट्रो सिटी कोलकत्ता, केरळ, चेन्नई यासारख्या शहरांत पोलिसांचे स्वतःचे अश्वदल आहे. मात्र, देशाची आर्थिक राजधानी आणि महत्त्वाचे शहर असलेल्या मुंबई पोलिस दलाकडे स्वतःचे अश्वदल नव्हते. शासकीय पातळीवर त्याची दखलही घेण्यात आली होती. ब्रिटिश राजवटीत मुंबईत पोलिसांचे अश्व दल कार्यरत होते. त्यानंतर थेट 2020मध्ये अश्वदलाची उभारणी करण्यात आली होती. तेव्हा सुरुवातीला 13 घोड्यांची खरेदी करण्यात आली होती. मात्र, पुरेशी निधीअभावी अनेक समस्या निर्माण झाली होती. यामुळं सहा घोड्यांचा मृत्यू झाला होता. तर, पाच घोडे नाशिक प्रशिक्षण केंद्रात पाठवले होते. सध्या फक्त दोन घोडेच पोलिसांकडे आहेत. मात्र त्याचा वापर गस्तीसाठी होत नाही.


आता पुन्हा एकदा अश्वदलाच्या उभारणीसाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला होता. अश्वदल चांगले व कायम सुरू राहावे यासाठी 30 ते 40 कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याचा प्रस्ताव पोलिसांनी सरकारकडे पाठवला होता. त्यानंतर शासनाने 36 कोटी 53 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आता लवकरच मुंबई पोलिसांच्या अश्व दलाची स्थापना करण्यात येणार आहे. लवकरच, मुंबई पोलिस घोड्यांवरून गस्त घालताना दिसतील.  मुंबईतील समुद्र किनारे तसेच गरज पडल्यास गर्दीच्या ठिकाणी मुंबई पोलिस घोड्यावरुन गस्त घालताना दिसतील. 


मुंबईत वाहनांना जाण्यासाठी जागा नाहीये अशावेळी घोड्यांवरुन गस्त कशी घालणार असा प्रश्न मुंबईकरांना पडला असेल. तर, एखादी अनुचित घटना घडल्यानंतर किंवा दहशतवादी हल्ला यासारख्या दुर्घटना घडल्यानंतर नेटवर्क ठप्प होऊ शकते. अशावेळी गोपनीय माहिती लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी घोड्यांचा वापर केला जातो. तसंच, समुद्रकिनारी असलेल्या वाळुत गाडी चालवणे व पायी चालणे कठिण जाते. अशावेळी घोड्यावरुन समुद्री किनारी गस्त घालणे अधीक सोयीचे होते.