मुंबईतील मुसळधार पावसाचा बळी, कामावरून घरी परतणाऱ्या महिलेचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू
Mumbai Rain Alert: मुंबईतील मुसळधार पावसामुळे अंधेरी सीप्झ कंपनी गेट क्रमांक 3 समोरील रस्त्यावरील चेंबर मध्ये पडून विमल अप्पाशा गायकवाड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे,
Mumbai Rain News: मुंबईत बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. ढगांच्या गडगडाटासह मुंबईतील विविध ठिकाणी पाऊस झाला. मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळं रस्त्याला नदीचे स्वरुप प्राप्त झाले होते. मुसळधार पावसामुळं मुंबईत महिलेचा बळी गेला आहे. तर आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अंधेरी येथे पाण्याचा अंदाज न आल्याने महिलेचा मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अंधेरी-सिप्झच्या गेट नंबर-3 समोर पाण्याचा अंदाज आल्याने महिला मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चिप्स कंपनीच्या गेट क्रमांक तीनसमोर चेंबरमध्ये पडून विमल अप्पाशा गायकवाड या महिलेचा मृत्यू झाला आहे. रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. महिला बेपत्ता झाल्याची माहिती समजल्यानंतर अग्निशमक दलाला याबाबत माहिती देण्यात आली. अग्मिशमन दलाने महिलेचा शोध घेतला असता तिचा मृतदेह सापडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या अंधेरी सिप्झ परिसरात मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी ड्रेनेजचे झाकण खुले होते. त्यावेळीच ही महिला चालत असताना ड्रेनेजमध्ये पडली आणि वाहून गेली. संध्याकाळी नऊच्या सुमारास महिला कंपनीतून बाहेर येऊन रस्ता क्रॉस करत असतानाच ही धटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारीदेखील घटनास्थळी पोहोचले होते.
अग्मिशमन दलाच्या जवानांनी तब्बल एक तासांचे अभियान राबवून महिलेचा शोध घेतला आहे. महिला नाल्यातून शंभर ते दीडशे मीटर दूर अंतरापर्यंत वाहून गेली होती. महिलेचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढला आहे.
खदाणीत दोन कामगाराचा विज पडून मृत्यू
कल्याण तालुक्यातील कांबा परिसरातील संध्याकाळी पाचच्या सुमारास घटना घडली आहे. कल्याण डोंबिवली परिसरात दुपार पासून ढगाच्या कडकटाड व विजेच्या गडगडातसह जोरदार पाऊस सुरु होता. राजन यादव ,बंदनाराम मुंडा हे दोन कामगार दगड खदाणीत काम करताना वीज पडून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची टिटवाळा पोलिसांची प्राथमिक माहिती दिली आहे. दोन्ही कामगारांना उल्हासनगरच्या सिव्हिल रुग्णालयात दोघाना नेण्यात आले मात्र डॉक्टरानी मृत्यू घोषित केले आहे. या घटनेचा टिटवाळा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मुंबई, ठाण्यात ऑरेंज अलर्ट
मुंबई आणि ठाण्यात आज देखील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कमी वेळेत अधिक पावसाची शक्यता, मात्र कालपेक्षा त्याची तीव्रता कमी असणार. मागील २४ तासांत मुंबईतील अनेक भागात अतिवृष्टी, काही ठिकाणी २५० मिमीहून अधिक पाऊस झाला आहे. पालघरमध्ये आज काही भागात अतिवृष्टीची शक्यता, एक दोन ठिकाणी २०० मिमीहून अधिक पावसाचा अंदाज, विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार