नाशिक : राज्यात हनुमान चालिसा आणि मशीदीवरील भोंगा यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरेंनी मशीदीवरील भोंगे हटवण्याबाबत अल्टिमेटम दिला. त्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. आता राज ठाकरेंना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आव्हान दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हनुमान चालिसा राज ठाकरेंनी म्हणून दाखवण्याचं आव्हान दिलं आहे. यासोबत संजय राऊत यांनी अयोध्येबाबत एक मोठी माहिती दिली. मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आदित्य ठाकरे अयोध्याची जाण्याची शक्यता आहे असं संजय राऊत यांनी सांगितलं. 


अयोध्या आमचं घर आहे. अयोध्येला आम्ही पाहुणे नाही. अयोध्या आमचं स्वागत करते असंही संजय राऊत बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचा खुलासा केला. 


संजय राऊत काय म्हणाले?


'बाबरी मशीदीचे ढाचे पाडण्यापासून ते राम मंदिराचा कळस उभारण्यापर्यंत मधल्या काळात अनेकदा आमचं जाणं येणं आहे. अयोध्येला आम्ही पाहुणे नाही. अयोध्या आमचं स्वागत करते. आम्ही जेव्हा तिथे जातो तेव्हा तिथले पुजारी रहिवासी आमच्या स्वागतासाठी येतात.'


'गेल्या अनेक वर्षांपासून आमचा आणि त्यांचा परिचय आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागच्या भेटीत असं ठरवलं होतं की, महाराष्ट्रातून जाणाऱ्या भाविकांसाठी तिथे निवासाची सोय करता यावी.'


आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. राम मंदिर आणि अयोध्या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राची नजर असणार आहे.