Mumbai-Sindhudurg flight : मुंबई - सिंधुदुर्ग विमानसेवा `या` तारखेपासून, 2500 रुपयांत प्रवास
Mumbai-Sindhudurg flight : आता कोकणात विमानाने जाता येणार आहे. मुंबई - सिंधुदुर्ग विमान प्रवास 2500 रूपयांत करता येणार आहे.
मुंबई : Mumbai-Sindhudurg flight : आता कोकणात विमानाने जाता येणार आहे. कारण सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे काम पूर्ण झाले असून या विमानतळाचे उद्घाटन 9 ऑक्टोबरला होणार आहे. याच दिवसापासून विमानसेवाही सुरु होणार आहे. मुंबई - सिंधुदुर्ग विमान प्रवास 2500 रूपयांत करता येणार आहे. दीड तासांत मुंबईतून सिंधुदुर्गात पोहोचता येणार आहे. (The Mumbai-Sindhudurg flight will start from October 9)
एअरलाईन्स कंपनी अलायन्स एअर (Alliance Air flying) 9 ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग उड्डाण सुरू करणार आहे. अलायन्स एअर ही एअर इंडियाची प्रादेशिक उड्डाण उपकंपनी आहे. एअर इंडिया लवकरच एका खासगी कंपनीच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्याची तयारी सुरू आहे. अलायन्स एअरने सांगितले की ते 9 ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग उड्डाणे सुरू करणार आहे. विमान प्रवासासाठी 2 हजार 520 रूपये शुल्क असणार आहे. अलायन्स एअर या मार्गावर दररोज थेट हवाई सेवा सुरू करेल.
चिपी विमानतळाचे उद्घाटन विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या दिवसापासून सिंधुदुर्ग ते मुंबई दरम्यान थेट विमानसेवा सुरू होईल. मुंबई सिंधुदुर्ग प्रवासासाठी 2 हजार 520 रूपये तर सिंधुदुर्ग ते मुंबई फेरीसाठी 2 हजार 621 रुपये भाडे आकारण्यात येणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. देशातील हवाई उड्डाणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशांतर्गत हवाई प्रवास सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने प्रादेशिक जोडणी योजना सुरू केली आहे. याअंतर्गत देशाच्या छोट्या विमानतळांवरून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात येत आहे.