Mumbai University Exam : मुंबई विद्यापीठाच्या 30 जानेवारीला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या
Mumbai University News : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी. मुंबई विद्यापीठाच्या 30 जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. (Mumbai University Exam)
Mumbai University Exam : राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाची ( Mumbai University) 30 जानेवारी 2023 रोजी होणारी 'लॉ'ची (कायदा) परीक्षा आणि विद्यापीठाच्या इतर परीक्षा 7 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात येणार आहेत. (Mumbai University Exam News In Marathi)
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. नाशिक ,अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाची देखील निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार 30 जानेवारी 2023 ला मतदान होणार आहे. तर, 2 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. या निवडणुकीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
Law, Engineering, M.Sc या परीक्षांचे चौथे सत्र, तर Commerce MCom भाग एक आणि अन्य संबंधित अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार होत्या. एकूण तीन परीक्षा या 30 जानेवारी रोजी घेण्यात येणार होत्या. निवडणुकीमुळे मानवता विषयाच्या पदव्युत्तर पदवी (MA) सत्र तिसरे, लॉ अभ्यासक्रमाचे सत्र दुसरे, Engineering अभ्यासक्रमाचे सत्र तिसरे, Science शाखेच्या M.Sc सत्र चौथे, M.Sc भाग दोन, कॉर्मस शाखेच्या, MCom भाग दोन या परीक्षा 30 जानेवारी रोजी नियोजित होत्या. मात्र आता त्या 7 फेब्रुवारीपासून घेण्यात येणार आहेत, असे विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान, Maharashtra Public Service Commission (MPSC) माध्यामातून बंपर भरती होणार आहे. MPSC मेगा भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. 8 हजार 169 जागांची भरती केली जाणार आहे. यासाठीची पूर्वपरिक्षा राज्यातल्या 37 जिल्हा केंद्रावर होणार आहे. संयुक्त पूर्व परिक्षेच्या निकालावर मुख्य परिक्षेसाठी पात्र उमेदवारांची मुख्य परिक्षा होणार आहे.
ही पूर्वपरिक्षा 30 एप्रिल रोजी होणार आहे. यातही महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023 ही 2 सप्टेंबर रोजी vतर गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023 ही 9 सप्टेंबर रोजी होणार आहे.