Mumabi Water Crisis Latest News:एका मागून एक पाणी भरण्यासाठी लागलेली टँकरची रांग, इमारतीतून निघणारे पाण्याचे पाईप,  ओसाड गाव-खेड्यात दिसणार असं चित्र मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आणि मुंबई महापालिका मुख्यालयाच्या बाजूच्या काळबादेवी परीसरात पहायला मिळत आहे. मुंबईच्या मायानगरीत पाण्याची वाणवा कधी निर्माण झाला?  असा प्रश्न  हे चित्र पाहून पडत आहे. तर, ही पाणी टंचाई नसून हा पाण्याचा सुरू असलेला गोरखधंदा आहे. आता हे बेकायदेशीरपणे विकलं जाणारं पाणी येतं कुठून, ते घेतं कोण आणि त्याची विक्री नेमकी करतंय कोण? याचा पर्दाफाश झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील काही बिल्डींगमध्ये जुन्या विहिरी आहेत.  त्यातील पाणी टँकरद्वारे विक्री केलं जातं.  दोन विहिरीतून 11 वर्षात 73 कोटी रूपयांच्या पाण्याची विक्री झाल्याची बाब समोर आली.  मुंबईमध्ये अशा सुमारे 21 हजार विहिरी आहेत.
मुंबईत बिल्डींगमध्य़ेच काही जुन्या विहरी आहेत. काही सोसायट्या मध्ये विहरी आहेत. त्यातील पाणी टँकर द्वारे विक्री केली जात आहे. ती वेगवेगळ्या कारणासाठी.


विहिरीतील पाणी उपसा करणे आणि त्याची विक्री करायची असेल तर भूमी जल प्राधिकरणाची परवानगी घेणे कायद्यानं बंधनकारक आहे. मात्र मुंबईत विहिरीतून पाणी उपसा करून विकणाऱ्या एकाही व्यक्तीने ही परवानगी घेतली नसल्याचं माहितीच्या अधिकारात समोर आल आहे.


मुंबईतील अनधिकृत पाणी उपसा आणि विक्रीमुळं भूर्गभातील पाणी पातळी धोक्यात आलीय, असं तज्ञांचं मत आहे. शिवाय सरकारचा करोडो रुपयांचा महसूलही बुडतोय.. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या पाणी विक्रीच्या धंद्यातून किती कोटींचे पाणी विकले गेले असेल याचा अंदाज न लावलेलाच बरा..