Mumbai Weather Latest Updates : भर दिवसा काळाकुटट् अंधार होऊन मुंबईत तुफान वादळ आले आहे. प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. वाऱ्यासह सर्वत्र धुळ उडत आहे.  पावसाळा सुरु होण्याआधीच मुंबईत पावसाचे आगमन झाले आहे. भर दिवसा काळाकुट्ट अंधार होऊन ढग दाटून आले आहेत. वादळामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे.  मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. मुलुंडमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. 


मुंबईची मेट्रो सेवा विस्कळीत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वादळामुळे मुंबईची मेट्रो सेवा देकील विस्कळीत झाली आहे. एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरचा पत्रा कोसळला. पत्रा कोसळल्याने मेट्रो सेवा थांबवण्यात आली. 


बदलापूरमध्ये गारांचा पाऊस


बदलापूरमध्ये गारांचा पाऊस पडला आहे. विजेच्या कडकटासह तुफान पाऊस बरसला आहे. तर, कल्याण डोंबिवलीत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. गेले काही दिवसांपासून उकाड्याने नागरिक हैराण झाले होते,त्यात अचानक आलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.  तर, अनेक नागरिकांची अचानक आलेल्या या पावसामुळे तारांबळ उडाली. अजूनही या भागात पाऊस पडतोय. ढगाळ वातावरण असल्याने अनेक भागात अंधार पसरला. त्यातच सोसाट्याचा वारा आणि पाऊस आल्याने वीज पुरवठा देकील खंडित झाला.