नागपूर : उत्तर भारतीय समाज मुंबई महाराष्ट्र चालवतो असा नवाच साक्षात्कार संजय निरूपम यांना झाला आहे. या वर्गाने एक दिवस काम केलं नाही तर संपू्र्ण मुंबई ठप्प होईल अशी वल्गना निरूपम यांनी केली आहे.


...तर संपूर्ण मुंबई ठप्प होईल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाषिक वाद पुन्हा उफाळेल असं वक्तव्य मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी केलं आहे. मुंबई आणि महाराष्ट्र उत्तर भारतीय चालवतात. फक्त एक दिवस या समाजाने काम केलं नाही तर संपूर्ण मुंबई ठप्प होईल अशी वल्गना त्यांनी नागपुरात उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेत केली. 


शिवसेनेची टीका


संजय निरूपम यांच्या वक्तव्याशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मात्र असहमती दर्शवली. तर निरूपम यांनी आपली लायकी ओळखावी अशी टीका शिवसेनेनं केली आहे.


निरूपम यांचा ताठा कायम


ऐवढं होऊनही निरूपम यांचा ताठा कायम आहे. राज्य सरकारची धोरणं उत्तर भारतीय विरोधी असल्याचा सूर त्यांनी आळवला. रिक्षासाठी मराठी भाषा सक्ती, फेरीवाला धोरण हे उत्तर भारतीय विरोधी असल्याचं ते म्हणाले.


भाषिक वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न


मुंबई शहराच्या योगदानात सर्वच भाषिक, प्रांतिक समाजांचा सहभाग आहे याबाबत दुमत नाहीच. पण त्याआधारे भाषिक वादंग निर्माण करण्याचा आणि चर्चेत राहण्याचा संजय निरूपम यांचा प्रयत्न संतापजनकच म्हणावा लागेल.