ठाणेकरांचा जीव धोक्यात! महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत तुमच्या इमारतीचं नाव तर नाही?
Dangerous Buildings Navi Mumbai and Thane : पावसाळ्यात तोंडावर येताच मुंबई आणि ठाण्यातील धोकादायक इमारतीचा मुद्दा ऐरणीवर येतो. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकांकडून धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. त्यातच आता ठाणे महापालिकेडून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
Thane Dangerous Buildings: मे महिना संपताच पुढच्या महिन्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे. पावसामध्ये अनेक भागात इमारती कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यात अनेकांना जीव गमवावा लागतो. पावसाळा सुरु झाला की, धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न दरवर्षी सतावत असतो. त्यानुसार महापालिका इमारतीचे सर्व्हे सुरु करतात. त्यानुसार ठाणे महापालिकेकडून (Thane Municipal Corporation) शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले असून नऊ प्रभागांमध्ये 4 हजार 397 धोकादायक इमारतींची यादी जाहिर करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ठाण्यातील (Thane Dangerous Buildings) अत्यंत धोकादायक, धोकादायक इमारतींचा प्रश्न चिंतेचा विषय झाला आहे. यामध्ये वागळे इस्टेट, नौपाडा, कळवा, मुंब्रा, दिवा याच बरोबर घोडबंदर या भागात बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. तर काही ठिकाणी मोडकळीस आल्याने इमारतीचे प्रमाण जास्त आहे. अश्या इमारती पावसाळ्यात कोसळून जीवितहानी झाल्याचे प्रकार घडतात. अशा घटना टाळण्यासाठी पूर्वनियोजन किंवा दक्ष राहण्यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने प्रभाग समितीनुसार इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. यामध्ये धोकादायक इमारतींचे वर्गीकरण करण्यात येते. C-1, C-2A, C2B आणि C3 अशा चार टप्प्यात केले जाते.
या सर्वेक्षणामधून 4297 इमारत धोकायक आल्याचे समोर आले आहे. यापैकी 86 इमारती अतिधोकादायक असून त्यापैकी 20 इमारती पाडण्यात आल्या आहेत. उर्वरित 66 इमारती पाडण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. पावसाळ्यात अशी इमारत कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या असून नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. अशा घटना रोखण्यासाठी महापालिका प्रशासन दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करते.
एकूण धोकादायक इमारती
मुंब्रा विभाग 1,372, वागळे विभाग 1,082, दिवा विभाग 742, नौपाडा-कोपरी 453, लोकमान्य-सावरकर नगर 221, कळवा 183, उथळसर 138, माजिवडा मानपाडा 145 आणि वर्तक नगर 61 क्रमांकाचा धोकादायक यादीत समावेश आहे.
धोकादायक इमारतींच्या यादी
ठाणे शहरात 2022 मध्ये 4397 धोकादायक इमारतींची नोंद झाली आहे. 2021 मध्येच धोकादायक इमारतींची संख्या 4523, 2020 मध्ये 4517, 2019 मध्ये 4507, 2018 मध्ये 4705, 2017 मध्ये 3693 आणि 2016 मध्ये 3607 अशी नोंदवण्यात आली आहे. दरवर्षी धोकादायक इमारती घोषित करूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही, असा नागरिकांचा अनुभव आहे.
52 इमारती अतिधोकादायक अवस्थेत
कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे 52 इमारतींची नोंद अतिधोकादायक अवस्थेच्या यादीत करण्यात आली आहे. वागळे इस्टेट व दिवा विभाग समितीच्या हद्दीत शून्य इमारती असल्याने त्या अत्यंत धोकादायक असल्याने चिंता व्यक्त होत आहे. अतिधोकादायक म्हणून अवघ्या 4 इमारतींची नोंद झाली आहे.