नागपूर : Madan Agarwal family suicide case : नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली होती. नागपूरमधल्या दयानंद पार्क परिसरातील एका घरात चार मृतदेह आढळल्याने सगळ्यानाच धक्का बसला. पती, पत्नी, दहा वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळून आला. ही हत्या की आत्महत्या याबाबत शंका उपस्थित होत होती. मात्र, कुटुंब प्रमुख मदन अग्रवाल यांनेच आपल्या कुटुंबाला संपवून स्वत: आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. त्याने हे तणावात केल्याची माहिती समोर येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मदन अग्रवाल यांनी केलेली कुटुंबाची हत्या आणि नंतर स्वतःची केलेल्या आत्महत्या प्रकरणात एक नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. मदन यांनी आपल्या दोन मुलांची तसेच पत्नीची हत्या केली होती. मदन यांना गेल्या 15 वर्षापासून ओळखणाऱ्या प्रकाश हरजानी या मित्राने दिलेल्या माहितीप्रमाणे मदन याचा चायनीजचा व्यवसाय चांगला चालत होता. रोज हजारो रुपयांचा त्यांचा व्यवसाय होता. त्याच्यातूनच त्यांनी जरीपटका परिसरात एक घर खरेदी केले होते. या घरांचे त्यांनी नुतनीकरण केले होते..


मात्र मदन यांना "क्रिकेट सट्टा" खास करुन आयपीएलमधील सट्टा खेळण्याची सवय होती आणि त्यातूनच गेल्या काही काळात मदन यांच्या आर्थिक अडचणी वाढत गेल्या. काही दिवसांपूर्वी खरेदी करून नुतनीकरण केलेले स्वतःचे घर विकण्याची वेळ त्यांच्यावर आली होती.  त्यामुळे ते तणावात होते.


मित्राने दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांच्यावर 40 ते 45 लाखांचा खर्च झाला होता आणि त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज त्यांचे मित्र प्रकाश हरजानी यांनी व्यक्त केला आहे.