दारुचोरीच्या संशयावरुन युवकाची हत्या
दारुचोरीच्या संशयावरुन युवकाच्या हत्या प्रकरणाचं गूढ उकललं आहे. दीड महिन्यानंतर या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. श्रीनिवास नैताम नावाचा युवक 26 मे पासून बेपत्ता होता. मृत युवकाच्या बहिणीने याबाबतची तक्रार पोलिसांकडे केली होती. या प्रकरणाचा तिने पाठपुरावा देखील केला. मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्यानं तिने अखेर चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांना साकडे घातले.
चंद्रपूर : दारुचोरीच्या संशयावरुन युवकाच्या हत्या प्रकरणाचं गूढ उकललं आहे. दीड महिन्यानंतर या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. श्रीनिवास नैताम नावाचा युवक 26 मे पासून बेपत्ता होता. मृत युवकाच्या बहिणीने याबाबतची तक्रार पोलिसांकडे केली होती. या प्रकरणाचा तिने पाठपुरावा देखील केला. मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्यानं तिने अखेर चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांना साकडे घातले.
पोलीस अधीक्षक नियती ठाकुर यांच्या सूचनेनुसार बल्लारपूर पोलिसांनी पथक स्थापन करुन या प्रकरणाचा तपास सुरु केला. संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या तिघांची कसून चौकशी करताच त्यांनी श्रीनिवासच्या हत्येची धक्कदायक कबुली दिली. बल्लारपुरातील दारू तस्कर असलेल्या आरोपींनी मयतावर त्यांनी लपवून ठेवलेली साडेपाच पेट्या दारू चोरल्याचा आरोप केला होता. या संशयावरून वाद होऊन तस्करांनी श्रीनिवासचं अपहरण केले आणि मारहाण करत त्याची हत्या केली होती. हत्येनंतर आरोपींनी श्रीनिवासचा मृतदेह नदीपात्रात फेकला होता.