तुषार तापसे, झी मीडिया, सातारा : सातारा (Satara) जिल्ह्यात वृद्ध दाम्पत्याच्या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली होती.  हनुमंत भाऊ निकम आणि कमल हनुमंत निकम या पती-पत्नीची हत्या  करण्यात आली होती. मात्र, अनेक दिवस या हत्याकांडाचा उलघडा झाला नव्हता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेनंतर संपूर्ण जिल्हात एकच खळबळ उडालीय होती. या खुनाची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. दोन दिवसांनंतर या खुनाची माहिती पोलिसांना मिळाली होती.


वृद्ध दांम्पत्याचा खून दोन दिवसापूर्वीच झाला होता. घरातून दोन दिवस कोणतीच हालचाल होत नसल्याने शेजारच्यांनी  घराची कडी उघडली. त्यावेळी वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह जमिनीवर पडलेले आढळवे. यादरम्यान कमल हनुमंत निकम यांच्या गळ्यातील दागिने गायब होते.


मात्र तब्बल 18 दिवसांनी दुहेरी खुनाचा उलगडा झाला आहे. सोन्याच्या हव्यासापोटी दोघांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या वृद्ध दांपत्याचा खून हा त्यांच्या नातेवाईकांनीच केला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 


संशयित मारेकरी सतीश शेवाळे आणि मित्र सखाराम आनंद मदने यांना पोलिसांनी या दुहेरी हत्याकांसाठी ताब्यात घेतलं आहे. दोघेही आरोपी फरार होते. अखेर सातारा पोलिसांना या क्लिष्ट गुन्ह्याची उकल करण्यात यश आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे.